रुम भाड्याच्या वादातून तरुणाची आत्महत्या माजी उपसरपंचासह तिघांवर गुन्हा दाखल

Foto

रुम भाड्याच्या वादातून तरुणाची आत्महत्या
माजी उपसरपंचासह तिघांवर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो) : थकीत खोली भाड्याच्या वादातून झालेल्या वादावादीनंतर एका २२ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रांजणगाव शेणपुंजी येथील पवननगर भागात उघडकीस आली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात रांजणगावचे माजी उपसरपंच तथा रूम मालक बाबासाहेब बटुळे यांच्यासह तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महारूद्र राऊत (वय २२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, ही घटना शुक्रवारी (१२ जून) दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.
वीरभद्र राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महारूद्रने मे २०२६ मध्ये त्याचा मित्र
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions
प्रवीण मापारी याने महारूद्र राऊत व पत्नी पल्लवी मापारी यांना भाड्याने खोली मिळवून दिली.
काही दिवसांत मापारी व त्याची पत्नी हे दोघे कोणाला न सांगता रुम सोडून गेले. दरम्यान, शुक्रवारी दुपारी बटुळे याने महारूद्र यास सोबत घेऊन त्याच्या वडीलांच्या दुकानावर जाऊन भाड्याबाबत विचारणा केली. त्यानंतर भाडे दिले नाही तर हातपाय तोडून टाकील अशी धमकी दिली. दरम्यान, दुपारी एकच्या सुमारास महारूद्रचा भाऊ प्रभात घरी आला असता दरवाजा बंद होता. खिडकीतून पाहिले असता महारूद्रने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडून त्यास घाटीत दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.